परीक्षेत कॉप्या करू नये यासाठी लढविली अशी शक्कल

0

बुलडाणा – संपूर्ण देशात रविवारी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’ घेण्यात आली. या परीक्षेत परीक्षार्थी विद्यार्थीनी कॉप्या करू नये यासाठी नवीन शक्कल लढविण्यात आली. परीक्षाकेंद्रावर विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली. तर विद्यार्थ्यी कॉलरमध्ये किंवा लांब बाह्य असलेल्या बाह्य असलेल्या शर्टात कॉप्या घेऊन जातात म्हणून चक्क कॉलर व लांब बाह्य कापण्यात आल्या. बुलडाणा येथे परीक्षेतील गैर प्रकार टाळण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. बुलडाण्यातील १२ परीक्षा केंद्रांवर पार पडली.

परीक्षेला आलेल्या एका विद्यार्थ्याने फॅशन पँट घातल्याने त्याला मज्जाव करण्यात आला होता. ही पँट बदलल्यानंतरच या विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. मुलींच्या बाबतीतही अशाच प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना पेन घेऊन जाण्यासही मज्जाव करण्यात आला. अशाप्रकारे तपासरणी केल्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ढासळल्याचे दिसून आले. कॉलर असलेली शर्ट अथवा लांब बाह्यांचे शर्ट परीक्षेदरम्यान घालू नये, याबाबतची नियमावली आधीच विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.