‘इमानदार निकला बडा लुटेरा’; केजरीवालांच्या विरोधात पोस्टर्सबाजी

0

नवी दिल्ली: दिल्लीतील राजकारण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधतात जाताना दिसत आहे. दरम्यान आता शिरोमणी अकाली दलचे आमदार मंजीनदर सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पोस्टर्सबाजी केली आहे. ‘खुद को सबसे बडा इनामदार बताने वाला निकला सबसे बडा लुटेरा’ अशा आशयाचे पोस्टर्स दिल्लीत झळकले आहे. जी शाळा ५ लाखात बनून तयार होईल, त्यासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप आमदार मंजीनदर सिंह यांनी केले आहे.