इमरान हाश्मीने घेतला शिवसेनेचा धसका; ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट बदलली !

0

मुंबई- येत्या २५ जानेवारीला शिवसेनाप्रमुख दिवंगत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दरम्यान २५ जानेवारीला इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’, २६ जानेवारीला कंगना रानौतचा ‘मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांशी’ ‘सुपर ३०’ हे चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र आता इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.

‘चीट इंडिया’ २५ जानेवरीऐवजी १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सौमिक सेन दिग्दर्शित ‘चीट इंडिया’ हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. गतवर्षी रिलीज झालेल्या इमरान खानच्या ‘मीडियम’ने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता इमरान हाश्मीही असेच काही करताना दिसणार आहे. इमरानने या चित्रपटात डोनेशन घेऊन मुलांचे अ‍ॅडमिशन करून देणा-या राकेश सिंह नावाचे पात्र साकारले आहे.

‘ठाकरे’चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्या दिवसी इतर कोणतेही चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी भूमिका शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतली आहे. बहुदा त्याचाच धसका घेत इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ची डेट बदलण्यात आली असावी अशी चर्चा आहे.