इस्लामाबाद – पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान तेहरीक-ए-इंसाफचे सर्वेसर्वा इम्रान खान आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सकाळी ९.३० वाजता शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी नॅशनल असेंबलीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत त्यांना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाकिस्तानचे राष्ट्रगित झाले. यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी इम्रान यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. नॅशनल असेंबलीमध्ये झालेल्या या निवडणुकीत पीएमएल-एनच्या वतीने शहबाज शरीफ हे इम्रान यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांचा पराभव झाला आहे. इम्रान यांचा पक्ष २५ जुलैला झालेल्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे