मुंबई: इम्तियाज अलीचा भाऊ साजिद अलीने ‘लैला मजनू’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर दिग्दर्शक म्हणून साजिदचा हा पहिलाच चित्रपट आहे. आता साजिद अली दिग्दर्शित ‘लैला मजनू’ चित्रपटाच्या निमित्ताने कोरियोग्राफीमध्ये इम्तियाज अली पदार्पण केले आहे. याची पटकथा इम्तियाजने लिहिली असून ‘सरफिरी…’ या गाण्याची कोरिओग्राफी इम्तियाज केली आहे.
आता जर माझे बरेच मित्र कोरिओग्राफर होऊन मला घाबरवत आहेत. तर मीसुद्धा विचार केला की कोरिओग्राफी करत त्यांना धक्का देतो, असे इम्तियाज अली एका मुलाखतीत म्हणाले. गाण्यांच्या सिनेमॅटोग्राफीबद्दल सुरुवातीपासूनच आवड असल्याचेही सांगितले.