भारत विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न…

न्हावी प्रतिनिधी दि 10

येथील भारत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पर्यवेक्षक एन एन अजलसोंडे यांनी भूषविले.यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामधील विजयी स्पर्धक गटाप्रमाणे आहेत

इयत्ता पाचवी ते सातवी गट प्रथम:-

तृतीय क्रमांक राजश्री विनोद मंडवाले ५अ द्वितीय क्रमांक कुंदा होमेश पाटील ७अ प्रथम क्रमांक जानवी प्रवीण पाटील ५अ

इयत्ता आठवी ते दहावी गट द्वितीय:-

तृतीय क्रमांक विभूषा गिरीश ढाके ८ब तृतीय क्रमांक छायल मिलिंद बढे १०ब तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक युक्ता राजेश बोरोले १० ब व प्रथम क्रमांक खुशबू गिरीश चौधरी १०अ

इयत्ता अकरावी ते बारावी गट तृतीय:-

प्रथम क्रमांक नयना नरेंद्र पाटील अकरावी सायन्स द्वितीय क्रमांक वैष्णवी नरेंद्र पाटील बारावी सायन्स तृतीय क्रमांक डिंपल दीपक मंडवाले अकरावी सायन्स याप्रमाणे विजयी स्पर्धक होते स्पर्धेनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष एन एन अजलसोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे

 

देण्यात आली स्पर्धेचे परीक्षक प्रा.एल आर सुपे सुनीता के निकुंभ कांचन चौधरी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी पर्यवेक्षक एन एन अजलसोंडे ज्येष्ठ शिक्षक व्ही बी वारके संगीता फिरके नीलिमा बढे प्रा. डी बी किरंगे याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी नीलिमा बोरोले यांनी सर्वांचे आभार मानले.