भुसावळ- भुसावळ तालुक्यात सध्या आयपीएल क्रिकेट सट्टा बेटिंग दिवस रात्र जोरात सुरू आहे. मोबाइल आणि सेल फोनचा वापर करून बुकी मोठया प्रमाणत हा सट्टा ऑनलाईन मोबाईलवर खेळत आहे. हा क्रिकेट सट्टा तत्काळ बंद करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, भुसावळ तालुक्यात सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटवर दिवसरात्र सट्टा लावला जातो आहे. या आयपीएल क्रिकेट सट्टा मोबाईल आणि सेल फोन यावर लावला जातो. या खेळात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. मलकापूरचे आमदार राजेश एडके यांनी देखील या संदर्भात विधानसभा मध्ये तरांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार जळगाव महीला उपअधीक्षक यांनी कारवाई केली होती. परंतू ज्यांच्या कारवाई तेच लोक पुन्हा भुसावळ शहरात सट्टा बुकीचे काम करीत आहे. या बुकीवर बाजार पेठ पोलिस स्टेशन, शहर पोलिस स्टेशन आणि डीवायएसपी यांच्यावर का कारवाई करीत नाहीं असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अवैध दारू, पत्ता, सट्टा, आयपीएल क्रिकेट सट्टामुळे तरुण वाम मार्गाला जाऊन त्यांचे संसार देशोधडीला येत आहे. भुसावळ तालुक्यातील अवैध सट्टा, पत्ता, अवैध दारू विक्री बंद करावी याची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक यांना आयपीएल सट्टेबाजार बुकिवर तसेच अवैध सट्टा, पत्ता, दारू विक्रीवर करवाई करण्याचे आदेश द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिला आहे.