बेंगळूरू: कर्नाटकात जेडीएस, कॉंग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागला असतांना मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय जाहीर करून करत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपाचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मी विश्वास ठरावाला तयार असून, तारीख आणि वेळ ठरवा असे कुमारस्वामी यांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना सांगितले आहे.
त्यांच्या या वक्तव्याने भाजपाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये दिसून येत नाही, असे वक्तव्य कुमारस्वामी यांच्या जवळच्या आमदाराने सांगितले. भाजपाला केवळ या गोष्टीचा संभ्रम निर्माण करून फायदा घ्यायचा आहे असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बंडखोर आमदारांची भेट घेऊन विश्वासात घेण्यासाठी काँग्रेसने कुमारस्वामींना पूर्ण सूट दिली आहे. बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना आघाडीत परतण्याचे कुमारस्वामींनी आवाहन केले आहे. भाजपचे कर्नाटकातील प्रभारी पी. मुरलीधर राव आणि जेडीए मंत्री एसआर रमेश यांच्यातील बैठकीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप आणि जेडीएस आघाडी करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कुमारस्वामींनी भाजपसाठी सर्व दारे बंद केली आहेत, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.