बंगलुरु: कर्नाटक मध्ये लोकसभेच्या निकालाआधी राजकीय घडामोडीना वेग आला आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस व जनता दल यांचे सरकार अल्पमतात येण्याची चिन्ह दिसत आहे.दिल्लीमध्ये मतदान यंत्रामध्ये गडबड झाल्याच्या मुद्द्यावर देशातील विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयोगाबरोबर बैठक करणार होते, त्या बैठकीला सगळे विरोधी पक्षाचे नेते आणि प्रादेशिक पक्षाचे नेते हजर राहणार होते.
या बैठकी अगोदरच कर्नाटक सरकार मधील काही नेते बंडखोरी करू शकतात, याची शक्यता कर्नाटक वर्तवण्यात आली असल्याने मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. या राजकीय हालचालींबाबत आज मुख्यमंत्री सायंकाळी कर्नाटक कॉंग्रेसचे प्रभारी के.सी वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत.
एक्झिट पोल नुसार कर्नाटक मध्ये कॉंग्रेस व जनता दल यांना केवळ ३ ते ६ जागा मिळणार असून, भाजपला २८ जागा मिळणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच सरकार मधील काही मंत्री बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. या अगोदर पण कर्नाटक मध्ये काही मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि जनता दल या पक्षांमध्ये तु तू मै मै पाहण्यात आली आहे.