नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपवर राफेल प्रकरणी टीका केली होती. विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा हा एकमेव मुद्दा होता. या प्रकरणी कोर्टाने देखील भाजपला क्लीनचीट दिली आहे. यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘चौकीदार चोर’ म्हणून उल्लेख केला होता. पुन्हा राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणात चोरी झाल्याचा पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाकडून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही आधीच केली आहे. माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे,’ असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर केलेल्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात भारताच्या शस्त्रसज्जतेवर भाष्य केलं होतं. ‘केंद्र सरकार देशाला संरक्षणसज्ज करण्यास कटिबद्ध आहे. लवकरच राफेल लढाऊ विमानं भारतीय संरक्षण दलाच्या ताफ्यात दाखल होतील’, असं ते म्हणाले होते. त्याबाबत राहुल गांधी यांना विचारलं असता, ‘या मुद्द्यावर माझी भूमिका बदलेली नाही. राफेल करारात भ्रष्टाचार झाला आहे. असं ते म्हणाले.