नंदुरबार शहरात महाराष्ट्र व्यायम शाळा परिसरात दोन गटात तुफान हाणामारी

नंदुरबार l प्रतिनिधी 

बापू घोडराज:-

नंदुरबार शहरात महाराष्ट्र व्यायम शाळा परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली असुन वाहनांच्या जळपोळीसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

नंदुरबार पोलीस प्रशासनाच्यावतीने वेळेत दाखल घेऊन जमावला पांगवून उद्रेक करणाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, परिसरात शांततेचे वातावरण असुन तनाव पूर्ण मशान शांतता पसरली आहे . तनाव पूर्ण वातावरण परिसरात पोलिसांचा अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आला आहे . नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर होत असलेल्या कुठल्याही पोस्ट अथवा बातमीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.रात्रभर संशयीतांची धरपकड सुरु आहे .या दगड फेकीत दोन पोलिस कर्मचारींना दुखापत झाली असुन शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा सर्व स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे