रावेर तालुक्यात;वादळी पावसामुळे अनेक घरांची पडझड

रावेर प्रतिनिधी l

रावेर तालुक्यात दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ नुकसान झाले आहे.लालमाती येथे अनेक कुटुंबाच्या घरांची पडझड झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आले.केळीच देखिल नुकसान असून अनेक ठिकाणी विद्युत तार खांबसहीत तुटून पडले आहे.घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बंडू कापसे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

रावेर शहरासह आदिवासी पट्यात आज दुपारी वादळी पासवाने मोठे नुकसान झाले आहे.रावेर शहरात कैकाडीवाडा येथे लिंबाचे झाड कोसळुन तीन मोटर सायकलचे नुकसान झाले आहे.घटनेची माहीती कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत मदत केली व तहसीलदार बंडू कापसे यांच्याशी बोलून पंचनामे करण्यासाठी विनंती केली.लालमाती (ता रावेर) येथे देखिल घरांची मोठी पडझड़ झाली असुन अनेक घर कोसळली आहे.विद्युत तार तूटून पडले असून खांब देखिल पडले आहे.घटनेची माहिती मिळताच लालमाती येथे कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील,ग्राम पंचायत सदस्य रुपाली धनगर,योगेश धनगर संजू जमादार यांनी गावात नुकसानग्रस्त भागाला भेट देत मदत केली.