शहादा तालुक्यात चक्री वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने वादळी वारा सोबत पाउससुध्दा ; केळी पपईसह घरांचे मोठे नुकसान
शहादा दि ५: चक्री वादळामुळे रविवारी ४जुन रोजी सकाळी १०.०० ते ११.०० वाजेच्या संपुर्ण शहादा तालुक्यात चक्री वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने वादळी वारा सोबत पाउससुध्दा झाला त्यामुळे केळी पपईसह घरांचे मोठे नुकसान झाले .नुकसान ग्रस्त झालेल्या पीकांचे पंचनामे करुन भरपाई देण्यात यावी अशी मागणी कृषी बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, उपसभापती डाॅ सुरेश नाईकसह संचालकांनी तहसीलदार श्री गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
शेतकरी यंदाच्या खरीपाच्या हंमामाच्या तयारीत होता . अचानक उदभवलेल्या परिस्थितीमुळे परीसरातील शेतकरी व नागरीकांची तारांबळ उडुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . तालुक्यात केळी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते . केळी हे पिक कापणी योग्य आले होते . या वादळी वाऱ्यामुळे सर्वात जास्त नुकसान या शेतकऱ्यांचे झाल आहे . तालुक्यात केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत . या हंगामासाठी परीसरातील बहुतांश पपई उत्पादक शेतकऱ्यांनी माहे एप्रील मध्ये पपईची लागवड केली होती . सदर लागवड केलेल्या पपईचे या वादळी वाऱ्यामुळे / पावसामुळे पपईची झाले कोलमडली आहेत . होती . अकस्मात शहादा तालुक्यात या रब्बी हंगामातील बाजरी या शेतीमालाची कापणी / मळणी सुरु आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . अचानक आलेल्या वादळामुळे तालुक्यात बऱ्याचठिकाणी काल सकाळ पासुन विज पुरवठा खंडीत झाला असुन विजेचे खांब व तारा जमीनीवर पडल्या आहेत . शेतीसाठी लागणारा विज पुरवठा बंद आहे . रविवारच्या या झालेल्या जोरदार वादळामुळे परीसरातील बऱ्याच घराचे नुकसान झाले आहे . घरावरील पत्रे उडाले आहेत . तालुक्यातील शेतकरी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत . नकसानग्रस्त भागातील शेतकरी व नागरीकांचे पंचनामे त्वरीत सुरू करण्यात येवून शासन दरबारी शेतक – यांना / नागरीकांना मदत मिळवून द्यावे . तसेच कापणीयोग्य झालेल्या केळी या फळपिकाचे बऱ्याच शेतकरी बंधुनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला असुन संबंधीत विभागास याबाबत सुचना देवुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवानां विमा रक्कम मिळवून देणेबाबत सुचना वजा आदेश द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे . निवेदनावर सभापती अभिजित पाटील, उपसभापती डाॅ सुरेश सुमेर सिंग नाईक , सत्यानंद प्रकाश पाटील , जगदेश काशिनाव पाटील , रमेश प्रकाश पाटील , निलेश भरत मराठे , राहुल भरत कोळी , निलेश चंद्रांत सुर्यवंशी , सतिष मुरलिधर धनगर , आनंद सोनवणे आदींच्या सह्या आहेत.