श्री पंढरपूर क्षेत्रा मध्ये वै. सद्गुरु झेंडू महाराज बेळीकर यांच्या मठामध्ये आरो कॉइन बॉक्स उद्घाटन

भुसावळ प्रतिनिधी दि 24 वारकऱ्यांना पाणी मिळावा या उद्देशाने श्री पंढरपूर क्षेत्रामध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी थंड पाण्याची सोय व्हावी त्या करीता वै. सद्गुरु झेंडू महाराज बेडेकर यांच्या मठामध्ये आरोचे पाणी एक रुपयात एक लिटर याप्रमाणे उपलब्ध वारकऱ्यांसाठी करून देण्यात आलेले आहे जेणेकरून वारकऱ्यांचा आत्मा शांत होईल या कॉइन बॉक्स उद्घाटन ह भ प गुरुवर्य भरजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले जेणेकरून वारकऱ्यांना कमी पैशात पाण्याची बॉटल घेता येईल या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला व आरो मशीनचे कॉइन बॉक्स बसवण्यात आले त्यांच्या उपक्रमाने वारकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलेले आहे.