तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धत १४,१७ वर्ष मुले व मुली गटात लॉर्ड गणेशा स्कूल अव्वल तर १९ वर्ष मुले व मुली गटात इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय विजयी..!

जामनेर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित तालुकास्तरीय शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा वयोगट १४, १७, १९ मुले, मुली लॉर्ड गणेशा स्कूल येथे आज संपन्न झाल्या*
*उद् घाटन शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, लॉर्ड गणेशा स्कूल संस्थेचे सचिव अभय बोहरा, प्रशासकीय अधिकारी सतीश मोरे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले याप्रसंगी तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान,अंजुमन उर्दू हायस्कूल उपमुख्याध्यापक शेख जलाल, पेत्रस शिरसाठ, वसीम अहमद, झहीर खान आदी. शाळेतील क्रीडा शिक्षकांची उपस्थित होती तर या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला होता*
*स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.*
*स्पर्धेसाठी मुख्य पंच डॉ. आसिफ खान, पंकज तिवारी, शेख मोहसीन, अबरार जुबेरी यांनी पंच म्हणून काम पाहिले.*
*तालुका स्पर्धा समिती प्रमुख नरेंद्र पाटील, आनंद मोरे, अमोल भालेराव यांनी परिश्रम घेतले.*
◼️निकाल पुढीप्रमाणे:-
▪️१४ वर्ष मुले –
विजयी :- लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल
उपविजयी:- अंजुमन हायस्कूल
▪️१४ वर्ष मुली –
विजयी :- लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल
▪️१७ वर्ष मुले-
विजयी :- लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल
उपविजयी:- अंजुमन हायस्कूल
▪️१७ वर्ष मुली –
विजयी :- लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल
▪️१९ वर्ष मुले –
विजयी :- इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,
▪️१९ वर्ष मुली-
विजयी :- इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय