कैदी चिन्याच्या मृत्यूप्रकरणी त. कारागृह अधीक्षक निलंबित

| जळगाव प्रतिनिधी ।

जिल्हा कारागृहात पोलिसांच्या मारहाणीत कच्चा कैदी चिन्या जगताप याचा मृत्यू झाल्याची घटना कारागृह अडीच वर्षापूर्वी घडली होती. या घटनेनंतर तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्स गायकवाड यांच्यासह ५ जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अमृतमहोला या प्रकरणाची राज्य शासनाच्या गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांनी दखल घेऊन अतत्कालीन अधीक्षक पेट्स गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. कारागृह अधीक्षक पेट्र्स गायकवाड, तुरुंगधिकारी, कारागृह पोलीस कर्मचारी यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप चिन्या जगताप यांच्या पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते.