गोवा : दुबईच्या राजाची मुलगी लतिफा काही दिवसांपूर्वी घरातून पळाली होती आणि गोवामार्गे अमेरिकेत जाण्याची योजना आखत होती. मात्र, मोदी सरकारने कोस्ट गार्डच्या सहाय्याने लतिफाला ताब्यात घेऊन तिला तिच्या मैत्रिणीसह दुबईच्या स्वाधीन केले. या राजकन्येला सर्वसामान्य व्यक्तींसारखे आयुष्य जगायचे होते. कुटुंबिय अत्याचार करत असल्याचा आरोप तिने केला होता. गोव्याच्या किनार्याजवळ ती असल्याची माहिती मिळताच तिची भारतातून सौदीत पाठवणी करण्यासाठी शेख मोहम्मद यांनी पंतप्रधान मोदींना गळ घातल्याचे सांगण्यात येत आहे. या राजकन्येच्या प्रकरणात मोदींनी हस्तक्षेप करत गुप्त मोहीम राबवल्याची धक्कादायक माहिती बिझनेस स्टँण्डर्डने दिली आहे. राजकन्या लतिफा आश्रितासाठी दयायाचना करत असताना तिला बळजबरीने भारतीय तटरक्षक दलाने सौदी सैन्याच्या ताब्यात दिले असल्याचा आरोप काहींनी केला आहे.