धुळे प्रतिनिधी ।
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ जागांवर निवडणूक झाली. त्यात आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे १५ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. दरम्यान या आधी व्यापारी मतदार संघातून विजय चिंचोले यांची एक जागा महाविकास आघाडीची बिनविरोध निवडून आली होती. दरम्यान भाजपच्या पॅनलमधील बाळासाहेब भदाणे, रावसाहेब गिरासे, विजय गजानन पाटील या प्रमुख उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभवाला तोंड द्यावे लागले. आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बाजार समितीच्या आवारात आ. कुणाल पाटील दाखल होताच फटाक्यांची आतिषबाजी, विजयाच्या घोषणा, गुलालाची उधळण, ढोलताशांच्या निनादाने परिसर दणाणून निघाला होता.
विजयी उमेदवार :
» आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने एकूण १५ जागांवर निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत सर्वच्या सर्व १५ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. सर्व उमेदवार २२५ पेक्षा अधिक मताधिक्य मिळवित विजयी झाले. त्यात महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सेवा सहकारी मतदार संघातून कोतेकर गुलाबराव धोंडू ( ८५०मते), ठाकरे ऋषीकेश अनिलराव ( ८४६ मते), पाटील यशवंत दामू (८२७मते), पाटील नानासाहेब देवराम (८२२मते), पाटील बाजीराव हिरामण ( ८०४मते), पाटील विशाल दिलीप (८०२मते), माळी गंगाधर लोटन (७७३मते), शिंदे विश्वास खंडू ( ८८९ मते), पाटील छाया प्रकाश
४० वर्षापासून सत्ता अबादीत
धुळे तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीवरील सत्ता महत्वाची ठरली आहे. राजकारणात अनेक स्थित्यंतर आली मात्र माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४० वर्षापासून काँग्रेसने आपली सत्ता अबादीत ठेवली आहे. १९८३ पासून माजी मंत्री पाटील यांचेच पॅनल बाजार समितीत विजयी होत आहे. आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.