बैठकीत महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग यांचेकडून कृषी विभागामार्फत मनरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला
मुक्ताईनगर प्रतिनिधी l
आज जळगाव येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांचे दालनात जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर ज्यांच्या विशेष सूचनेवरून बैठक आयोजित करण्यात आले होते सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग यांचेकडून कृषी विभागामार्फत मनरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार केळी तसेच इतर फळपिके तसेच काही मसाला पिके नव्याने मनरेगा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत मुक्ताईनगर तालुक्यात जळगाव जिल्हा हा केळी पट्टा असल्यामुळे मनरेगाच्या माध्यमातून केळी पीक लागवड यशस्वीरित्या होण्यासाठी योजनेतील बारकावे तसेच त्रुटी वर चर्चा करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदर बैठक आयोजित केली होती मनरेगाच्या माध्यमातून केळी लागवड करण्यासाठी कमीत कमी क्षेत्र योजनेसाठी त्रिवार्षिक कालावधीसाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे सदर योजनेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेता यावा म्हणून मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न आहे
याव्यतिरिक्त सदर बैठकीत केळीचे ब्रेक कॉलिंग चेंबर रायपनिंग चेंबर तसेच केळीचा हमीभाव तसेच शासनाच्या यंत्रणेच्या माध्यमातून केळी निर्यातीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार साहेबांनी बोलून दाखवले त्यासोबतच शेतकऱ्यांना राज्यात व राज्याबाहेर शेतीच्या संदर्भात होणाऱ्या नवनवीन प्रयोगांची माहिती मिळण्यासाठी तसेच नैसर्गिक तथा सेंद्रिय शेतीची माहिती मिळण्यासाठी अधिकाधिक अभ्यास दौरे आत्मा समितीच्या माध्यमातून नियोजित करण्यात यावे असे सूचना जिल्हा कृषी अधिक्षक यांना दिल्या
सदर बैठकीस दिलीप पाटील , नवनीत पाटील , महेंद्र मोंढाळे कोळी , मोहन बेलदार , पंकज राणे, वसंत भलेभले , अमोल पाटील , दीपक वाघ , शिवाजी पाटील , सचिन भोई, निलेश मेढे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.