वरणगांव। प्रतिनिधी पुढील वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला जाणार आहे यामध्ये स्टेम म्हणजेच सायन्स टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग आणि मॅथेमॅटिक्स यावर आधारित अभ्यासक्रमाला महत्त्व देण्यात आले आहे . यामुळे विद्यार्थ्यांना पाठांतरापासून सुट्टी होऊन पायाभूत संकल्पना स्वतः समजून घेता येणार आहे या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सहसंबंध , संवाद, शोध, प्रश्नांची उकल व विचार करणे, आणि रचनात्मक कार्य यावर भर देण्यात आला आहे यामुळे विद्यार्थी हा शालेय वातावरणाच्या व्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञानावर देखील व प्रात्यक्षिकावर भर देण्यात आल्याने त्याचा अभ्यासक्रमामध्ये कल वाढणार आहे . आवडीनिवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे तसेच परीक्षा ही दोन सत्रात होणार असल्याने विद्यार्थ्यांवर येणारा ताण देखील कमी करता येऊ शकेल नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे असेल असे प्रतिपादन रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ चंद्रमौली माऊली जोशी यांनी केले . प. क. कोटेच्या माध्यमिक विद्यालय भुसावळ येथे रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अंतर्गत एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टच्या माध्यमातून तीन दिवसीय स्टेमवर आधारित विद्यार्थ्यांचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी प.क. कोटेच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता राणे होत्या . यावेळी नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, डॉ. पी एस कोळी , डॉ. महेंद्र चौधरी, नीलिमा वाघुळदे , उषा रिसर्च सायन्स सेंटरचे अध्यक्ष जीवन महाजन ,धीरज चौधरी , निलीमा पाटील, सुनील वानखेडे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. चंद्रमौली जोशी यांनी पाण्यापासून दिवा पेटवून विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी मुळे झालेला बदल पटवून दिला . यानंतर विद्यार्थ्यांनी भौमितिक विविध आकृत्याचे पृष्ठभाग, बाजू, शिरोबिंदू यासह विविध आकृत्या तयार करून समजून घेतल्या .
पायाभूत संकल्पना समजून घ्या
नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहज व सोप्या पद्धतीने विज्ञान व गणितातील संकल्पना समजावून सांगितलेले आहे यामुळे रटाळ वाटणारे गणित व विज्ञान हे विषय सोपे होणार आहे यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन झाल्याने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून गणितातील सूत्रे व भौमितिक आकृत्या समजून घेता येऊ शकतात असे
संगीता राणे मुख्याध्यापिका प .क. कोटेचा माध्यमिक विद्यालय, भुसावळ यांनी सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार धीरज चौधरी यांनी व्यक्त केले .