रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात बोदवड शहर येथे मंत्री मा.ना.गिरीषभाऊ महाजन व खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भाजपच्या संपर्क से संवाद अभियानाचा शुभारंभ
भुसावळ प्रतिनिधी दि 21
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा तर्फे संपर्क से संवाद अभियानाची रावेर लोकसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर विधानसभा अंतर्गत बोदवड शहर येथे मंत्री गिरीषभाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख नंदकिशोर महाजन, मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर व भाजपा प्रदेश चिटणीस अजय भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आला.
यावेळी मंत्री गिरीषभाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख नंदकिशोर महाजन, मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर व भाजपा प्रदेश चिटणीस श्री.अजय भोळे यांनी बोदवड शहरातील अरविंद बरडीया, गोपालशेट अग्रवाल, प्रशांत भोजनाळे, अनंत कुलकर्णी ई. यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन मोदी सरकार मार्फत जनसामान्यपासून तर विविध क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा जोखा मांडण्यात आला व माहिती पत्रक वाटप करण्यात आले, तसेच जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येऊन, मोदी सरकारच्या कामकाजाविषयी वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात आले.तसेच मोबाईल क्र.९०९०९०२०२४ वर मिस कॉल देऊन प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पाठींबा देण्यात आला.
यावेळी मंत्री गिरीषभाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, लोकसभा निवडणुक प्रमुख नंदकिशोर महाजन व मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, भाजपा प्रदेश चिटणीस अजय भोळे यांच्यासह तालुकाध्यक्ष संचालक प्रभाकर पाटील, दूधसंघ संचालक मधुकर राणे, तालुका सरचिटणीस राजेंद्र डापसे, संतोष चौधरी, तालुका उपाध्यक्ष श्री.विक्रमसिंग पाटील, नगरसेवक विजूशेठ बडगुजर शहरराध्यक्ष नरेश आहुजा, भाजयूमो तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, धनराज सुतार, अमोल शिरपूरकर, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष गणेश लोणारे, उमेश गुरव, राम आहुजा, पंकज डिके, परमेश्वर टिकरे, ब्रिजलाल जैन, पवन जैन, राहुल माळी, विशाल तांगळे, वैभव माटे, जनार्दन चौधरी तसेच भाजपा पदाधिकारी बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.