भुसावळ विभागीय कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत
भुसावळ प्रतिनिधी दि 30
आज उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुसावळ येथे जिल्हाधिकारी अमान मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले असता, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार संजय सावकारे यांच्यासह उपस्थित राहून विभागांतर्गत विविध विषयावर चर्चा करून मार्गी लावणे बाबत मागणी केली.
यावेळी भुसावळ शहारात वांजोळा चौक येथे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून, सदर ठिकाणी जिल्हाधिकारी व आमदार संजय सावकारे यांच्यासह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, सदर ठिकाणी लवकरात लवकर अंडर बायपास चालू करणे विषयी मागणी केली, तसेच शहरातील नागरिकांना मुख्य महामार्ग नओलांडता सर्व्हिस रोड वापरण्याचे आव्हाहन केले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अमान मित्तल, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, भुसावळ मुख्याधिकारी महेश वाघमारे, नायब तहसिलदार आसटकर, आरटीऑ लोही, एनएचएआय अधिकारी पवार, भाजपा शहराध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे, माजी नगरसेवक अजय नागरानी, सतीश सपकाळे, पिंटू ठाकूर ई. उपस्थित होते.