सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगासाठी काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

0

नवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव राष्ट्रपतींनी नाकारल्याने काँग्रेसने अखेर सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंह बाजवा आणि अमी याग्निक यांनी ही याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत काँग्रेस खासदारांनी म्हटले आहे की, एकदा खासदारांकडून महाभियोग प्रस्तावावर सह्या झाल्यानंतर उपराष्ट्रपतींकडे दुसरा पर्याय शिल्लक नसतो. त्यांनी या नोटिशीच्या आधारे तपास आयोग नेमून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील आरोपांची पूर्ण चौकशी व्हायला हवी.