मधापुरीत कोम्बिंग ; कुविख्यात दरोडेखोर जाळ्यात

0
मुक्ताईनगर- दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणार्‍या कुविख्यात दरोडेखोराला तालुक्यातील मधापुरी गावात राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमधून अटक करण्यात आली. निशाण जणपत पवार (रा. मधापुरी, ता.मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 2 रोजी पहाटे मुक्ताईनगरचे निरीक्षक अशोक कडलग यांच्या नेतृत्वात कोम्बिंग राबवून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीविरुद्ध गु.र.नं. 47/2016 भा.दं.वि. कलम 395, 397, 327 नुसार गुन्हा दाखल होता व तब्बल दोन वर्षांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत असल्याने त्यास अखेर अटक करण्यात आली.