वरणगांवात महिला संघटनेच्या सभेत – पदाधिकाऱ्यांची झाली निवड

वरणगांव । प्रतिनिधी

दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा महिला विभाग तर्फे झालेल्या महिला संघटना सभेत भुसावळ व बोदवड तालुका महिला अध्यक्षांची निवड करण्यात आली.

 

लुंबिनी नगर वरणगांव येथे प्रमिला किशोर भालेराव (जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा), कविता शशिकांत इंगळे (जिल्हा महिला महासचिव) यांनी महिला संघटना सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी अरुणाताई इंगळे (महाराष्ट्र महिला अध्यक्षा) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शुंभागी डोंगरे (महाराष्ट्र महिला सचिव), सुरेखा महिरे (महाराष्ट्र महिला संघटिका) यांची उपस्थिती होती. यावेळी

जळगाव जिल्हा महिला कार्यकारणी मधील रिक्तपदी संगीता बोलके (जिल्हा महिला संघटिका), वंदना बोदडे (भुसावळ तालुका महिला अध्यक्षा), मंदाताई केदारे (भुसावळ तालुका महिला संस्कार प्रमुख), निर्मला बावस्कर (बोदवड तालुका महिला अध्यक्षा) यांची नियुक्ती पत्रक देऊन निवड करण्यात आली. कार्यक्रमाला संपूर्ण जळगाव जिल्हा महिला कार्यकारणीमधील जिल्हा, तालुका, ग्रामशाखा महिला पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये लुंबिनी नगर वरणगाव, तळवेल, भालोद (ता.यावल ), मुक्ताईनगर, अन्नपूर्णा नगर, शेलवड ( ता. बोदवड ), येथील कार्यकारणी मधील महिला भगिनींचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमिला किशोर भालेराव, सूत्रसंचालन कुसुम गायकवाड व आभार प्रदर्शन संगीता बोलके यांनी व्यक्त केले.

 

*♦️कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम*♦️

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकांत इंगळे (नायब तहसीलदार तथा दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष), किशोर भालेराव (जिल्हा सहकोषाध्यक्ष), संजय गुरचळ (भुसावळ तालुका उपाध्यक्ष), प्रमिला गुरचळ (भुसावळ तालुका महिला कोषाध्यक्षा), यांनी परिश्रम घेतले.तसेच पंचशीला भालेराव, प्रतिभा बावस्कर,अलका खराटे, वच्छलाबाई सुरवाडे, शोभाबाई सुरवाडे, संघमित्रा तायडे तसेच संपूर्ण लुंबिनी नगर मधील महिलांनी सहकार्य केले.