भोळे महाविद्यालयात युवती सभा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

भुसावळ प्रतिनिधी दि 31

येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविदयालयात दि. ३१/८/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता युवती सभेचे उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा आर पी फालक होते तर उद्घाटक व प्रमुख पाहुण्या म्हणून माजी विद्यार्थीनी सौ. माधुरी रोकडे पाटील ए पी आय नवी मुंबई या होत्या त्यांनी स्वरस्वती पूजन स्व.दादासाहेब देविदास भोळे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून युवती सभा कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी व्यासपीठावर प्रा संगीता धर्माधिकारी, महेंद्र पाटील

उपस्थित होते एपीआय,माधुरी रोकडे पाटील हीनेविद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते, भावनांच्या जास्त आहारी जाऊन नका जीवनात शिस्त असावी ध्येयनिश्चिती असावी परिस्थिती वर मात करून ध्येयपूर्ती साठी समायोजन करावे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश कसे संपादन करावे या बद्दल अनुभव सांगितला. घरची बेताची परिस्थिती असून देखील स्पर्धा परीक्षा शुल्क मार्गदर्शन पुस्तके मिळवून कसे मिळवून अभ्यास केला याचे कथन केले, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांनी अभ्यास, क्रीडा व स्पर्धा परीक्षा बाबत कसे मार्गदर्शन केले ते सांगितले, चिकाटी आत्मविश्वास, जिद्द, परिश्रम यांच्या जोरावर यशस्वी कसे होता येते ते स्वानुभावावरून पटवून दिले.

प्राचार्य आर पी फालक यांनी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा, पुस्तकपेढी, आर्थिक मदत यांची माहीती सांगितली विद्यार्थ्यांसाठी असे सर्वांगीण विकास कार्यक्रम वर्षभर राबवित असतात त्याचा फायदा नवीन विद्यार्थी यांनी घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा संगीता धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन प्रा डॅा माधुरी पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा डॅा जयश्री सरोदे यांनी केले कार्यक्रमाला प्रा डॅा संजय चौधरी प्रा डॅा अनिल सावळे प्रा डॅा जगदीश चव्हाण प्रा डॅा अंजली पाटील, प्रा श्रेया चौधरी व महाविद्यालयातील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.