व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचा पदग्रहण समारंभ

शहादा । येथील हॉटेल पटेल रेसिडेन्सी सभागृहात व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या शहादा तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर होते. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रुपेश जाधव, कार्याध्यक्षपदी दै. ‘जनशक्ति’ चे तालुका प्रमुख बापू घोडराज यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी जितेंद्र गिरासे, नरेंद्र गुरव, सचिव हर्षल

सोनवणे, खजिनदार संतोष जव्हेरी यांच्यासह उर्वरित पदाधिकाऱ्यांची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष धनराज माळी, साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल रोकडे, जिल्हा कोषाध्यक्ष विनय जैन, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रवींद्र पंड्या, प्रा. डी. सी. पाटील, ईश्वर पाटील, संजय राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.