चोपडा रोटरी भवनाचे उत्साहात उद्घाटन

चोपडा प्रतिनिधी

52 वर्षांपासून सातत्याने सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम व कार्यक्रमांद्वारे अखंड सेवारत असणाऱ्या चोपडा रोटरी क्लबच्या वास्तूचे म्हणजेच रोटरी भवनाचे विधिवत उद्घाटन रोटरी इंटरनॅशनल फॉउंडेशन चे ट्रस्टी मा डॉ भरत पंड्या यांच्या शुभहस्ते हरेश्वर कॉलनी या परिसरात संपन्न झाले.

चोपडा रोटरी क्लब ने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी नागपूर पासून ते नाशिक पर्यंत असणाऱ्या डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये आपले एक वेगळे स्थान मिळवल्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांनी चोपडा रोटरी क्लबचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी रोटरी इंटरनॅशनल ट्रस्टसाठी चोपडा क्लबच्या सर्व सभासदांनी मिळून 85 हजार रुपयांचा सहयोग निधीचा धनादेश डॉ भरत पंड्या यांना सुपूर्त करण्यात आला. रोटरी भवनासाठी रुपये पाच लाखाचा निधी देणाऱ्या स्वर्गीय रोटे.श्री एल. एन. बापू पाटील यांच्या कुटुंबाचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात आला .

तसेच रोटरी भवनाचे आकर्षक बांधकाम वेळेत पूर्ण करून दिल्याबद्दल आर्किटेक्ट प्रकाश गुजराथी व इंजिनीयर मनोज पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यासाठी डिस्ट्रिक्ट 3030 मधील माजी प्रांतपाल तसेच जळगाव, भुसावळ ,अमळनेर ,धुळे येथील तसेच चोपड्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच रोटरी क्लबच्या सर्व माजी अध्यक्ष आणि माजी सभासद यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक रोटरी इंटरनॅशनल फॉउंडेशन चे ट्रस्टी मा डॉ भरत पंड्या अध्यक्षस्थानी

माजी विधानसभा अध्यक्ष श्री अरुणभाई गुजराती प्रांतपाल डॉ आनंद झुनझूनवाला सहप्रांतपाल नितीन अहिरराव विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते .

मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड रुपेश पाटील मानद सचिव गौरव महाले रोटरी सेवा संस्थेचे अध्यक्ष आशिष गुजराथी उपाध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील सचिव अशोक जैन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण ॲड रुपेश पाटील यांनी केले तसेच प्रास्ताविक आशिष गुजराथी यांनी तर आभार प्रदर्शन गौरव महाले यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय बारी सर यांनी केले.