रा.प.महामंडळाच्या नविन लालपरी (परिवर्तन) बसेसचे जळगांव विभागात पालकमंत्री ना.मा.गुलाबराव पाटील साहेब यांचे हस्ते लोकार्पण…
जळगांव : रा.प.महामंडळाने नुकत्याच नविन लालपरी (परिवर्तन) बसेस ची निर्मिती केली असून ह्या बसेस मध्ये २x२ पुशबॅक सीट्ससह प्रवाशांसाठी अनेक सुविधा आहेत. पहील्या टप्प्यात अशा १० बसेस जळगांव विभागाला मिळाल्या असुन आज ह्या बसेसचे सागर पार्क जळगांव येथे जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांचे हस्ते लोकर्पण करण्यात आले. याप्रसंगी आ.मा.चिमणराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच यावेळी रा.प.जळगांव विभागाने प्रवासी वाहतुकीचे उत्कृष्ट नियोजन करुन उत्पन्नात दररोज सुमारे १ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल पालकमंत्री साहेबांनी रा.प.जळगांव विभागाचे विभाग नियंत्रक मा.भगवान जगनोर साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी विभागीय वाहतुक अधिकारी श्री.दिलीप बंजारा , सहा.यंत्र अभियंता श्री.चौधरी , जळगांव आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) श्री.संदीप पाटील , विभागीय कामगार अधिकारी श्री.कमलेश भावसार , विभागीय लेखाधिकारी श्री.मिलिंद सांगळे , विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री.दिपक जाधव , विभागीय स्थापत्य अधिकारी श्री.निलेश पाटील , विभागीय सांखिकी अधिकारी श्री.सोनवणे , विभागीय वाहतुक अधिक्षक श्री.कीशोर महाजन , जळगांव आगार व्यवस्थापक श्री.विजयकुमार पाटील यांचे सह मोठ्याप्रमाणात रा.प. कर्मचार्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रा.प.जळगांव आगाराचे सहय्यक कार्यशाळा अधिक्षक श्री.बेनकुळे , सहाय्यक वाहतुक अधिक्षक श्री.मनोज तिवारी , प्रभारक श्री.राजेश पाटील , वाहतुक निरिक्षक श्री.सोनटक्के , श्री.भरत सुर्यवंशी , वाहन परिक्षक श्री.मनोहर मिस्तरी , वाहतुक नियंत्रक श्री.संदीप सुर्यवंशी , श्री.कैलास पाटील व अमिन पटेल यांनी परिश्रम घेतले.