पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाचं लोकार्पण

देशाच्या नव्या संसद भवानचा आज उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेंगोलची विधीवत पूजा करून लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापित केला आहे. यापुर्वी पंतप्रधान मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. या विधींमध्ये पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोलची पूजा केली, त्यानंतर संतांसमोर आदरपूर्वक साष्टांग नमस्कार केला. यानंतर संतांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सेंगोलसह नवीन संसद भवनात प्रवेश केला. त्यांनी सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला वैदिक मंत्रोच्चारात स्थापित केला.

स्वातंत्र्याच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांना विचारण्यात आलं होतं की, सत्ता हस्तांतरणाबाबत या नियोजन आहे. त्यावेळी सत्ता हस्तांतरणाबाबत नेहरूांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. सी. गोपालाचीर यांनाही विचारलं. यातून सेंगोलच्या प्रक्रियेला चिन्हात केलं गेलं. पंडित नेहरू यांनी पवित्र सेंगोलला तमिळनाडूहून मागवलं होतं. त्यानंतर इंग्रजांकडून जो सेंगोल राजदंड स्वीकारून सत्ता स्थापन केली होती.

सेंगोल ज्यांना मिळतो त्यांना निष्पक्ष आणि न्यायपूर्ण शासन करणे अभिप्रेत असतं. हा राजदंड चोला साम्राज्याशी निगडीत आहे. तामिळनाडूच्या पुजाऱ्यांकडून यावर धार्मिक क्रिया करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य काळात हा राजदंड नेहरूंकडे सोपवण्यात आला होता. १९४७ नंतर या राजदंडाचा विसर पडला होता. १९७१ मध्ये तामिळनाडूच्या विद्वांनांनी हा राडदंड पुन्हा चर्चेत आणला होता. तर २०२१-२२ मध्ये भारत सरकारने याविषयी माहिती केली होती. महत्वाचं म्हणजे १९४७ साली तमिळचे जे विद्वान उपस्थित होते ते २८ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमातही उपस्थित राहणार असल्याची महत्वपूर्ण माहिती अमित शाहांनी दिली.