अमरावती-चिखली रा.मा.क्र.५३ वरील शेळद ते नांदुरा खंड चौपदरीकरणाचे केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांचं हस्ते लोकार्पण, यावेळी खासदार रक्षाताई खडसे उपस्थित
भुसावळ प्रतिनिधी l अमरावती ते चिखली राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील शेळद ते नांदुरा या ४५ कि.मी. लांबी व रु.८१६ कोटी निधीच्या विकास कामाचे आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याहस्ते डॉ.आंबेडकर मैदान, खामगांव येथे लोकार्पण झाले, यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह खासदार रक्षाताई खडसे उपस्थित होत्या.
सदर शेळद-नांदुरा खंडाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची एकूण लांबी ४५ किमी असून याअंतर्गत १४ किमीचा ग्रीनफील्ड बायपास, ४ प्रमुख पुल, १६ छोटे पुल, ६३ कल्व्हर्ट, १ आरओबी, ८ वाहन अंडरपास, २ पादचारी अंडरपास, १२ बस शेल्टर यांचा समावेश आहे. सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी मार्फत १२०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह मलकापूर-बुलढाणा-चिखली व २५ कोटींसह चिखली ते टाकरखेड व अन्य रस्त्यांच्या कामांस मंजूरी देण्यात आली, याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी मार्च महिन्यात त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व खासदार रक्षाताई खडसे त्यांच्यासह बुलडाणा खासदार प्रतापरावजी जाधव, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार चैनसुखजी संचेती, माजी मंत्री आ. प्रविणजी पोटे पाटील, डॉ.राजेंद्रजी फडके, भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्ष आकाशदादा फुंडकर, विधानपरिषद सदस्य आ .वसंतजी खंडेलवाल, आमदार राजेशजी एकडे ई. प्रमुख उपस्थितीत होते.