रेल्वे अप्रेंटीस विद्यार्थ्याचा रेल्वे भरतीत समावेश करा; खासदार खडसे यांची रेल्वेमंत्री यांचेकडे मागणी.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विषयांवर चर्चाकरून, बोदवड स्टेशन येथे गाड्यांना थांबा देणे व विविध सुविधा पुरविणे बाबत केली मागणी

 

खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे भवन, नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री .अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन एप्रिल २०१९ मध्ये रेल्वे अप्रेंटीस उतीर्ण झालेल्या उमेदवारांचा रेल्वे भर्ती बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या सीईएन नं.आरआरसी-०१/२०१९ (लेव्हल १ पद) पद भरती मध्ये संधी देण्यात यावी अशी महत्वपूर्ण मागणी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री यांच्या कडे केली.

 

एप्रिल २०१९ मध्ये उतीर्ण झालेल्या पण नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रमाणपत्र मिळालेल्या रेल्वे अप्रेंटीस उमेदवारांना रेल्वे भर्ती बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या सीईएन नं.आरआरसी-०१/२०१९ (लेव्हल १ पद) पद भरती अंतर्गत रेल्वे मार्फत वैद्यकीय तपासणी होऊन गुणवत्तेच्या आधारावर निवड झाली होती, परंतु सदर विद्यार्थ्यांचे रेल्वे अप्रेंटीस प्रमाणपत्र नोव्हेंबर २०१९ चे असल्यामुळे भरतीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती.

 

याबाबत खासदार खडसे यांनी प्रधानमंत्री .नरेंद्र मोदी व रेल्वे राज्यमंत्री .रावसाहेब दानवे यांना सुद्धा याबाबत विनंती केली असता, प्रधानमंत्री कार्यालय व रेल्वे राज्यमंत्री यांचे कडून सुद्धा सदर उमेदवारांना संधी देण्यात येईल याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. अशी माहिती खासदार खडसे यांनी यावेळी दिली.

 

तसेच रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विषयांवर चर्चा करून, बोदवड स्टेशन येथे विविध गाड्यांना थांबा देऊन स्टेशनवर महत्वपूर्ण विविध सुविधा उपलब्ध करणे बाबत, खासदार खडसे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना निवेदन देऊन मागणी केली.