नवी दिल्ली-दिल्लीमधील चांदनी चौक परिसरात आयकर विभागाने आठ ठिकाणी छापे टाकले. यात आयकर विभागाने धाड टाकत२५ कोटींची रोकड जप्त केली आहे. आयकर विभागाने जवळपास १०० लॉकर्सची तपासणी करत ही रक्कम जप्त केली आहे.
व्यवसायिक आपले पैसे लपवून ठेवण्यासाठी या खासगी लॉकर्सचा उपयोग करत होते असे सांगितले जात आहे. है पैसे राजधानीमधील काही हाय प्रोफाईल लोकांचे असल्याचे कळत आहे. यामध्ये तंबाखू व्यवसायिक, केमिकल व्यवसायिक आणि ड्राय फ्रूट डिलर्सचा समावेश आहे.
या व्यवसायिकांचा हवाला ट्रेडिंगमधअये सहभाग असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे संबंध आहेत. तपास यंत्रणांनी केलेली या वर्षातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. सप्टेंबर महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ७०० कोटींच्या दुबईशी संबधित हवाला रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत 29 लाखांची रोख रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली होती.
ही कारवाई दुबई स्थित हवाला ऑपरेटर पंकज कपूर याचे व्यवसाय आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्याचं सुत्रांकडून समजलं होतं. तपास यंत्रणा त्याची चौकशी करत आहे. जानेवारी महिन्यात आयकर विभागाने खासगी लॉकरमधून ४० कोटींची रक्कम जप्त केली होती.