हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

0

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोल्हापुरचे आमदार, तथा कोल्हापुर जिल्हा बँकेचे संचालक हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर खात्याने धाड टाकली आहे. ही धाड त्यांच्या कागल येथील घरावर गुरुवारी सकाळी टाकण्यात आली. मुश्रीफ यांच्या कागल येथील खाजगी साखर कारखाना, पुण्यातील मुलाचे घर व टाकाळा परिसरात राहणारे मुश्रीफ यांचे साडू यांच्या घरावर ही आयकर विभागाने छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेध्याध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याची जाहीर समारंभात ऑफर दिली होती. मुश्रीफ यांनी नकार देऊन शरद पवार हेच आपले देव असल्याचे सांगितले होते. कर्नाटकात एकेक आमदाराला खरेदी करण्यासाठी ७० कोटी रुपये भाजपाने दिले असून, हा पैसा आला कोठून? अशी विचारणा केली होती. त्याचा परिणाम म्हणूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.