सिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम समिती प्रभाग समिती व प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्त्यांची निवड येत्या पंधरा दिवसात पूर्ण करून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनेची ताकद वाढवा
सिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम समिती प्रभाग समिती व प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्त्यांची निवड येत्या पंधरा दिवसात पूर्ण करून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनेची ताकद वाढवा असे आवाहन आज प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री प्रदीप राव यांनी सिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केले आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामकांत सनेर हे होते.
आज सकाळी दहा वाजता आशापुरी देवी पाटण येथील सभागृहात सिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्राम समिती स्थापना प्रभाग समिती स्थापना व प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्त्यांची त्वरित निवड करणे बाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार तात्काळ पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही कार्यवाही करण्यात यावी. याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या प्रारंभी श्री दिनेश माळी यांची शिंदखेडा शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप साळुंखे, प्रमोद सिसोदे सुनील चौधरी दीपक अहिरे यांनी पक्ष संघटना वाढीसाठी आपण सर्वांनी वेळ द्यावा असे आवाहन केले, प्राध्यापक सुरेश देसले म्हणाले की पक्ष संघटना मजबूत असल्याशिवाय निवडणुका जिंकणे कठीण आहे आगामी काळातील निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना बांधणीचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. राजकारणात पक्ष संघटना हा आत्मा आहे आत्म्याचा संरक्षण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले पाहिजे . तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम भाऊ स नेर यांचे नावाचा जर पक्ष विचार करणार असेल तर सिंदखेडा तालुक्यातील जनता त्यांना निश्चित संधी देईल दोन विधान सभा निवडणुकीतील त्यांचा पराभव आणि सततचा त्यांचा जनतेशी असलेले नाते यामुळे त्यांना निश्चितच शिंदखेडा तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि सिंदखेडा तालुक्याच्या वैभवात देखील निश्चित भर पडेल पक्षाने त्यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यास आम्ही त्यांच्या विजयासाठी कटिबद्ध राहू. धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत स नेर यावेळी म्हणाले की प्रदेश काँग्रेसचा प्रत्येक गावातील ग्राम समिती प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्त्यांची समिती प्रभाग समिती या येत्या पंधरा दिवसात प्रत्यक्ष गावात संपर्क साधून तयार करण्यात येतील. तसेच भारतीय जनता पार्टीचे शासनाला सत्तेत बसून नऊ वर्षे झालीत या कार्यकाळातील धोरणांच्या विरोधात “नऊ वर्ष ‘ नऊ सवाल: नावाचा एक अभियान तालुक्यात राबवले जाईल त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात केंद्र सरकारने केलेली दिशाभूल जनतेच्या लक्षात आणून दिली जाईल व त्यासाठी जनजागरण करण्यात येईल .सध्या राज्य सरकारकडून सुद्धा अत्यंत चुकीचे काम केली जात आहेत तालुक्यात देखील दिशाभूल केली जात आहे इंदोर मनमाड रेल्वे मार्ग असेल किंवा दोन हजार कोटींच्या कामांची हवा केली जात आहे हे सर्व कागदावर घोषणाबाजी दिसत आहे जनतेची दिशाभूल भारतीय जनता पार्टी कडून होत असल्याचे दिसत आहे. कापूस उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना नरेंद्र मोदी यांनी दोंडाईचा येथील सभेत “मेने तुम्हारा प्याज खाया” ‘मतलब तुम्हारा “नमक” खाया है.? तुम्हारा पसीना से बनाया हुआ कपास से मैने कपडा पहना है? तुम्ही आम्हाला मते द्या आम्हाला सत्तेवर बसवा निश्चित आम्ही कांदा उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे हिताचे धोरण व त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भातील धोरणात बदल करून त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून दिला जाईल असे स्वप्न रंगवले होते मात्र सत्तेत आल्यानंतर देखील मिठाला न जागणारे देशाची भाजपा व केंद्रस्थानी सत्तेवर बसलेले राज्यकर्ते यांच्याकडून जनतेची व शेतकऱ्यांची स्वप्नभंग केली जात आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे त्या विरोधात तालुक्यात जनजागृती केली जाईल . तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आगामी काळात पक्ष संघटना बांधण्यासाठी आपलं योगदान पक्षाच्या बाजूने उभं करावं असे देखील मत श्री स ने र यांनी व्यक्त व्यक्त केले.
बैठकीचे प्रस्ताविक प्राध्यापक विशाल पवार सर यांनी केले यावेळी मंचावर पांडुरंग जिभाऊ माळी दोंडाईचा शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसंत कोळी प्रदेश युवक राहुल माणिक पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे सिंदखेडा नगरीचे गटनेते दीपक देसले जिल्हा बँकेचे संच माजी संचालक प्रकाश पाटील माजी संचालक शरद पाटील माजी उपसभापती श्यामकांत पाटील माझी संचालक भानुदास पाटील माजी पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम दादा पाटील माधव शेठ बडगुजर हेमराज पाटील चंद्रकांत शिरसाट आबा मुंडे शिवाजी पाटील भानुदास पाटील देवबा पठाण प्रशांत पाटील रवी गिरासे भोजू सिंग गिरासे पावा कोळी लोटन भाऊ माळी सुजित पवार भाईदास निळे भगत दादा धनगर नरेंद्र पाटील भैय्या माळी विलास गोसावी एडवोकेट सचिन पवार शेख पंढरीनाथ सिसोदे महेंद्र भिल पंजाब पवार गोपाल देवकर दीपक महेंद्र भदाणे दीपक बापू पवार राजेंद्र पवार नाना दादा सोनवणे किरण गिरासे भागवत परदेशी अशोक बोरसे धनराज थोरात उमेश वाडीले मधु बापू पाटील भाऊसाहेब शिवाजी पाटील किशोर पवार उमेश पवार विशाल साळुंखे शरद पवार मनोज कुमार प्रवीण पाटील महेंद्र देसले खंडू भदाने श्याम पाटील विलास पाटील विलासराव सोनवणे शब्बीर पठाण कल्लू पठाण प्रवीण पवार प्रमोद बोरसे निंबा पवार बिट्टू बेहेरे रतिलाल पाटील युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वीरेंद्र झालसे बाबळ्याचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील मधुकर पद मोर कुलदीप निकम बापू काळू पाटील धुरा पाटील रावसाहेब पाटील दोंडाईचा चे माजी नगरसेवक अशोक सोनवणे पाटील धनराज देसले निखिल वरुडे पंकज पाटील आधी बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते