रावेर प्रतिनिधी दि 6 रावेर पिपल्स बँक निवडणुकीत ‘सहकार पॅनला’ मतदारांकडून वाढता पाठिंबा विरोधकांसाठी डोकेदुखी वाढली आहे. रावेर परिसरातील ६ हजार ९०० मतदार दि १० जून’ला तेरा जागांसाठी मतदान करणार आहे. बँकेच्या हीतासाठी सहकार क्षेत्रातील जानकार असलेल्या ‘सहकार पॅनला’ निवडुन देण्याचे अवाहन पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर महाजन यांनी केले आहे.
रावेर पिपल्स बँक निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ विरुध्द ‘लोकमान्य पॅनल’ अशी सरळ लढत होत आहे.यामध्ये इतर मागासवर्गीय मतदार संघात ज्ञानेश्वर हरीभाऊ महाजन जनरल मतदार संघात राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (राजू ठेकेदार) पंकज राजीव पाटील,यशवंत व्यंकटराव पाटील (वाय व्ही पाटील) यादवराव विष्णु पाटील,सोपान बाबुराव पाटील,एकनाथ जगन्नाथ महाजन(ई जे महाजन)विपीन विजय राणे कैलास दयालदास वाणी लढत आहे.महिला राखीव मतदारसंघातुन पुष्पाबाई गणेश महाजन मिराबाई चंपालाल राऊत तर भटक्या विमुक्त जाती जमाती मधुन महेंद्र राजराम पवार अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातुन विनोद नारायण तायडे रिंगणात आहे.रावेर शहरासह परिसरातुन ‘सहकार पॅनला’वाढता पाठिंब्यामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे.