इन्क्रेडद्वारे सुलभ दुचाकी वाहन कर्ज सुविधेची सुरुवात

0

मुंबई : भारतातील मध्यमवर्गीयांसाठी कर्ज सुविधा सुलभ करण्याकरिता तंत्रज्ञान व डेटा-सायन्समध्ये अग्रस्थानी इन्क्रेड या नव्या पिढीच्या आर्थिक सेवा समूहाने सुलभ दुचाकी वाहन कर्ज सुविधेची सुरुवात केली आहे. इन्क्रेड हे आपल्या मालकीचे तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक माहिती विश्लेषण प्रणालीचा उपयोग करून कर्ज घेण्यातील विलंब कमी करून अधिक सुलभ आणि कोणत्याही त्रासाशिवाय कर्ज वितरण करते. इन्क्रेडच्या या नवीन योजनेचा उद्देश ६ राज्यांमधील आपल्या कार्यालयातून कर्जदारांना सुलभ आणि सोयिस्कर मार्गाने कर्ज उपलब्ध करून देण्याचे आहे.