नवी दिल्ली-इंग्लंड दौऱ्याआधी फिटनेस टेस्टमध्ये नापास झालेल्या अंबाती रायडूऐवजी सुरेश रैनाची संघात निवड करण्यात आलेली आहे. बीसीसीआयने याबद्दलची घोषणा केली आहे. मोहम्मद शमीपाठोपाठ यो-यो टेस्ट नापास झाल्यामुळे संघाबाहेर पडणारा अंबाती रायडू हा दुसरा खेळाडू ठरला आहे. मोहम्मद शमीला अफगाणिस्तान कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरेश रैनाने आपला शेवटचा वन-डे सामना खेळला होता. या सामन्यात रैनाने अवघ्या १२ धावा केल्या होत्या.