अहमदाबाद – भारत-ऑस्ट्रेलिया (India VS Austriliya cricket) यांच्यातील गावस्कर-बॉर्डर करंडक मालिकेतील प्रत्येक लढतीपूर्वी होणारी खेळपट्टीबाबतची चर्चा वाढतच आहे. अहमदाबादला होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी मंगळवारीही दोन खेळपट्ट्या तयार होत असल्याने नेमक्या कोणत्या खेळपट्ट्यांवर लढत होणार याबाबतचे औत्सुक्य वाढले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ सरावासाठी मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर(narendra modi stadium) आला होता. त्यांना दोन खेळपट्ट्या पाहून धक्काच बसला. या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळाचा आनंद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह घेणार आहेत. अर्थातच त्यामुळे या कसोटीच्यावेळी अतिरिक्त सुरक्षा असेल. त्याची तयारी स्टेडियमवर सुरू आहे, पण त्याहीपेक्षा दोन खेळपट्टींवर सुरू असलेले काम जास्त लक्ष वेधून घेत होते.
हे देखील वाचा
खेळपट्ट्यांची स्वतंत्र पाहणी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी दोन्ही खेळपट्ट्यांची स्वतंत्र पाहणी केली. मात्र दोघेही पूर्व बाजूस असलेल्या खेळपट्टीच्या नजिक जास्त वेळ थांबले होते. त्याच्या नजिकची खेळपट्टी दोघांच्या पाहणीनंतर पुन्हा आच्छादित करण्यात आली. दोघांनी जास्त पाहणी केलेल्या खेळपट्टीवर गवत कमी आहे. ही खेळपट्टी फिरकीस जास्त साथ देण्याची शक्यता आहे. अर्थात या स्टेडियममधील सामन्याचा इतिहास लक्षात घेतल्यास खेळपट्टी पूर्णपणे फिरकीस साथ देण्याची शक्यता आहे. येथील दोनपैकी एक कसोटी दोन दिवसात, तर दुसरी तीन दिवसांत संपली होती.