नवी दिल्ली-भारत आणि चीनमध्ये व्यापार वाढत असून दोन्ही देशांमध्ये सहकार्य विस्तारत आहे. मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी जी परिपक्वता आणि हुशारी दाखवली त्यामुळे आज सीमेवर शांतता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सिंगापूर दौऱ्यावर शांगरी ला डायलॉग परीषदेत ते बोलत आहेत. भारतात व्यवसाय प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मोदी म्हणाले.हजारो वर्षांपासून भारतीय पूर्वे दिशेला फक्त सूर्योदय पाहण्यासाठी नव्हे तर तो प्रकाश संपूर्ण जगाला मिळावा यासाठी प्रार्थना करत आहेत. सिंगापूर हे भारताचे पूर्वेचे प्रवेशद्वार आहे असे मोदी म्हणाले.
Singapore is our springboard to the ASEAN. It has been, for centuries, a gateway for India to the broader East. : PM Narendra Modi at Shangri-La Dialogue in #Singapore pic.twitter.com/aqfE7bke9t
— ANI (@ANI) June 1, 2018
The Indian Ocean has shaped much of India's history. It now holds the key to our future. The ocean carries 90% of India's trade & our energy sources. It is also the lifeline of global commerce: PM Narendra Modi at Shangri-La Dialogue in #Singapore pic.twitter.com/s3y1KwNcPW
— ANI (@ANI) June 1, 2018