पॉझिटिव्ह बातमी: देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० टक्क्यांवर

0

नवी दिल्ली: कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. दररोज ६० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतातील रिकव्हरी रेट देखील मोठा आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ७५ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी मागील २४ तासांत देशभरात ६१ हजार ८७१ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतातील रुग्ण संख्या ७४ लाख ९४ हजार ५५२ वर पोहोचली आहे. बाधितांच्या संख्येने मोठा टप्पा गाठला असला तरी रिकव्हरी रेट ८८ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. ६५ लाख ९७ २१० बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ७ लाख ८३ हजार ३११ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० टक्क्यावर आली आहे. आतापर्यंत १ लाख १४ हजार ०३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

दरम्यान भारतातील कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. दररोज दहा लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असतात. १० कोटींच्या जवळपास कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.