आज भारताचा सामना श्रीलंका सोबत, केदार जाधवला पुन्हा एकदा संधी?

0

लीड्स : आज भारतीय संघाचा सामना श्रीलंकेविरुध्द होत असून, हा सामना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीला सामोरे जाण्यापूर्वीची रंगीत तालीमच आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना वगळता भारताने विजयी आवेशात बाद फेरी गाठली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना होणारा आहे. आजचा सामना भारत जिंकल्यास गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करू शकतो.

भारताला अग्रस्थान मिळाल्यास उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होईल, तर दुसरे स्थान मिळाल्यास यजमान इंग्लंडशी गाठ पडेल. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे झाला नाही. हा सामना वगळल्यास उर्वरित सात सामन्यांत भारतीय संघाला मधल्या फळीचा गुंता सुटलेला नाही. श्रीलंकेच्या संघात बरेच डावखुरे फलंदाज असल्यामुळे जडेजाऐवजी केदार जाधवला पुन्हा संघात स्थान मिळू शकते.

आता पर्यंत विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात ८ सामने झाले आहे. त्यात भारत ३ सामने जिंकला आहे, तर श्रीलंका ४ सामने जिंकला आहे, १ सामना रद्द झाला आहे. आज होणाऱ्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.