जकार्ता-इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आज अखेरच्या दिवशी भारताने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४९ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित पांघलने अंतिम फेरीत उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा पराभव करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. अखेरच्या दिवसात अमितने भारतासाठी मिळवलेले हे पहिलं सुवर्णपदक ठरले आहे. याचसोबत यंदाच्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला आहे.
जागतिक क्रमवारी आणि अनुभवामध्ये हसनबॉय हा अमितपेक्षा खूप मोठा आहे. मात्र अमितने अंतिम सामन्यात हसनबॉयला पराभव चाखवल.