भारत वि.ऑस्ट्रेलिया कसोटी: ४४३ धावांवर भारताकडून डाव घोषित

0

मेलबर्न – भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरी कसोटी खेळली जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुसऱ्या दिवशी भारताने ४४३ धावांवर डाव घोषित केला. ७ गडी बाद ४४३ अशी भारताची स्थिती होती.

पहिल्या दिवशी भारताने दोन बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली होती.

भारताने डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने खेळ सुरु केला आहे.