नवी दिल्ली । स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) जारी केलेल्या अहवालानुसार, लष्करावर सर्वाधिक खर्च करणार्या टॉप-5 देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. सिप्रीने अहवालात म्हटले आहे की, 2017 मध्ये भारताचा लष्करावरील खर्च 5.5 टक्क्यांनी वाढून 63.9 अब्ज डॉलरवर गेला. भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक झाला आहे. जगाचा लष्करावरील खर्च अल्प प्रमाणात वाढून 1.73 लाख कोटींवर गेला आहे. हा खर्च जागतिक सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.2 टक्के आहे. लष्करावर सर्वाधिक खर्च करणार्या देशांत अमेरिका आणि चीनचा दबदबा कायम आहे. अमेरिकेचा लष्करावरील खर्च 610 अब्ज डॉलर तर चीनचा 228 अब्ज डॉलर आहे.