नवी दिल्ली: वाघा बोर्डर येथे कर्तारपूर कॉरिडोरवर भारत आणि पाकिस्तानमध्ये बैठक सुरु आहे. भारतीय प्रतिनिधिमंडळ सीमेवर पोहोचले, त्यानंतर हीबैठक सुरु झाली.
दरम्यान बैठक सुरु होण्याच्या आधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ.मोहम्मद फैसल यांनी पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडोरला कार्यान्वित करण्यासाठी सहकार्य करणा असल्याचे ग्वाही दिली. गुरुद्वाराचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून आजच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.