अक्कलकुवा (प्रतिनिधी)
देशात तसेच जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सरकारने आपल्या नववर्षांच्या कारकिर्दीत सर्व समावेशक असंख्य लोककल्याणकारी योजना राबवून कोट्यवधी जनतेचे जीवन सुखकर झाले आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य निमंत्रित तथा अक्कलकुवा धडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी सेवा सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत १४ कलमी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले , यावेळी विधानसभा प्रभारी कपिलदेव चौधरी उपस्थित होते .
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्रसरकाने यशस्वीरित्या लोककल्याणकारी योजना राबवत ९ वर्षे पुर्ण होत असुन या ९ वर्षांचा कार्यकाळात केंद्रसरकारने केलेल्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी मोदी @ ९ कार्यक्रम राबविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील ९ वर्षांचा केंद्रसरकारच्या कार्यकाळातील सर्वात महत्वपुर्ण बाब म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदी एका आदिवासी महीलेला महामहीम राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मूजी यांची निवड करुन देशाच्या सर्वोच्च पदी सन्मानाने विराजमान करुन नविन इतिहास घडवीला तसेच आदिवासी स्वाभिमान दिन आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित देशात १० आदिवासी संग्रहालये निर्माण करून आदिवासी स्वातंत्र्यवीरांच्या इतिहासाला उजाळा दिला आहे. सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्रभक्तां प्रति असलेल्या आपला राष्ट्रभक्तीचे भावना प्रकट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ९ वर्षांचा कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी योजना सुरु करुन त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली असुन देशातील कोटयावधी जनतेला त्याचा फायदा होऊन त्यांचे जीवन सुखकर केले आहे.
जगात उद्भवलेली कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी देशातील कोटयवधी लोकसंख्येला मोफत लसीकरण करुन त्यांचे जीवन वाचविले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वाटप केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशात ३ कोटी गरीब कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पुर्ण केले आहे. ११.८ कोटी घरांपर्यंत जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनेंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणी पोहचले आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक रु ६०००/- आर्थिक मदत केली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत ९.६ कोटी एल.पी.जी. जोडणी करुन महीलांचे जीवन सुखकर केले आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सौभाग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना, सौरपंप योजना, आयुष्यमान भारत योजना, शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्टैंड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत मिशन यांसारख्या अनेक महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबवुन त्यांचा फायदा जनतेला करुन दिला आहे.
भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी ५वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. डिजीटल पेमेंट व्यवहारात भारत जगात पहील्या क्रमांकावर पोहोचली आहे. पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदीच्या ९ वर्षांचा कार्यकाळात भारताची सुरक्षा मजबुत झाली आहे. “वसुधैव कुटुंबकम्” या धर्तीवर भारताने सर्वप्रथम G२० शिखर परिषदेचे २०२३ चे अध्यक्षपद सम्मानाने स्विकारले जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे एकंदरीत केंद्र सरकारने आपल्या नववर्षाच्या कार्यकाळात असंख्य लोकहिताच्या जनकल्याणकारी योजना राबवून देशाच्या काना कोपऱ्यातील खेड्यापाड्यापासून तर शहरातील महानगरांचा चेहरा मोहरा मोहरा बदलून संपूर्ण देशाच्या आश्चर्यकारक बदल केला आहे.