आशादायक: गेल्या काही महिन्यात प्रथमच कमी रुग्णांची नोंद; मृतांचा आकडाही घटला

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. भारतातही कोरोनाने कहर केला आहे. दररोज ८५ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. त्यातच भारतातील कोरोनाग्रस्तांची ६७ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतातील कोरोना बळीच्या संख्येने देखील एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र मागील तीन-चार दिवसांपासून काहीशी दिलासादायक परिस्थिती आहे. ८५ हजारापेक्षा अधिक आढळून येणारी रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांपासून कमी झाली आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस रुग्णसंख्या ७५ हजारापेक्षा कमी आढळून आली आहे. त्यातच सोमवारी मागील २४ तासात ६१ हजार २६७ नवीन बाधित आढळून आले आहे. तर ८८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ८०-८५ हजारापेक्षा अधिक आढळून येणारी रुग्ण संख्या ६१ हजाराच्या टप्प्यात आल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. ही गेल्या काही महिन्यांपासूनची सर्वाधिक कमी संख्या आहे.

आतापर्यंत ६६ लाख ८५ हजार ८३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ५६ लाख लाख ६२ हजार ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुर्दैवाने आतापर्यंत १ लाख तीन हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९ लाख १९ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. भारतातील रिकव्हरी रेत ८४.७० वर पोहोचला आहे. सध्या १३.७५ टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहे. मृत्यू दर १.५५ टक्के आहे.