वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; यांना मिळाले स्थान !

0

मुंबई: आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात झाली आहे. तीन टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीय संघ जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी निवडीची घोषणा केली आहे. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला स्थान देण्यात आले आहे. धोनीच्या जागी ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे.

निवड समितीच्या बैठकीला कर्णधार विराट कोहली उपस्थित होता. येत्या ३ ऑगस्टपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

असा आहे भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), राहणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी , जसप्रिट बुमरा, उमेश यादव