भारत वि.ऑस्ट्रेलिया २०-२० सामना: भारतीय संघ जाहीर

0

नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला टी-२० सामना उद्या बुधवारी होणार आहे. बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. के.एल राहुलला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येणार की पाच गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

टी-२० संघामध्ये परतल्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी पुन्हा एकदा विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. यष्टीरक्षकाची जबाबदारी युवा पंतकडे सोपवण्यात आली आहे. तर अनुभवी दिनेश कार्तिकला फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील मनीष पांडेला अंतिम १२ मध्ये संधी देण्यात आलेली नाही.

भारतीय संघ
विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल राहुल, पंत, दिनेश कार्तिक, क्रृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि यजुर्वेंद्र चहल   आदींचा समावेश आहे.